सर्व समाज बांधवांना कळविण्यात येते की, रविवार तारीख 13 फेब्रुवारी 2022 ला सकाळी 11.00 वाजता, समाज भवन सुयोग नगर नागपूर येथे समाजातील उपवर-वधू (युवा-युवतीं) चा परिचय मेळावा अ.भा. धनोजे कुणबी समाज आणि राष्ट्रीय सेवक मंडळ नागपूर च्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेला आहे. तरी जास्तीत जास्त समाज बांधव तसेच युवा-युवतींनी नोंदणी करुन लाभ घ्यावा असे अध्यक्ष श्री गजेन्द्रजी आसुटकर यांनी आवाहन केलेले आहे.
सावनेर ला नागपूर जिल्हा तसेच सौंसर तालुक्यातील समाजाच्या गुणवंत विद्यार्थी, आदर्श षिक्षक तसेच सामाजिक व कृषी क्षेत्रातील गुणवत्ता प्राप्त व्यक्तींचा सत्कार समारंभ आयोजीत करून गुणगौरव शनिवार दिनांक 18/09/2021 रोजी करण्यात आला. कार्यक्रमात एकुण 90 विद्यार्थी आणि 9 आदर्श षिक्षक तसेच सामाजिक व कृषी क्षेत्रातील व्यक्तींचा गुणगौरव करून एकुण 23 विद्याथ्र्यांना रोख बक्षिसे देण्यात आली. तसेच अभियांत्रीकी चे शिक्षण घेत असलेला आणि ज्.20 ब्तपबामज ब्ींउचपवदेीपच.2021 करिता निवड झालेला विद्यार्थी अश्विन अरविंद मोवाडे याचाही सत्कार करून समाजातर्फे आर्थिक मदत करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मा. डाॅ. गंगाधर बोबडे (संस्थापक अ.भा. धनोजे कुणबी समाज नागपूर) हे होते तर प्रमुख पाहूणे मा. सोनबाजी मुसळे, मा. मनोहरराव कुंभारे, मा.सौ. रेखाताई मोवाडे (नगराध्यक्षा सावनेर) हे होते. तसेच श्री गंगाधर माडेकर, श्री रामरावजी मोवाडे, श्री किशोरजी मुसळे, डाॅ. परेश पिंगे, श्री अविनाशजी झाडे, श्री राजुभाऊ घुगल हे प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री गिरीश मोवाडे यांनी तसेच आभार प्रदर्शन श्री किशोर मुसळे यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजक श्री पुंडलिक बोंडे यांना सर्वश्री विजय निखाडे, राजेंद्र बोढे, गणेश ढोके, नरेंद्र डाखरे, दिलीप घोरमारे, अनिल बोरकडे, रूपेश खुसपरे, ज्ञानेश्वर बोंडे, प्रफुण 65 समाज बांधवांचा सत्कार करण्यात आला.
”धनोजे कुणबी समाज सेवा संघ नागपूर“ चे वतीने आयोजीत समाजाचे ”स्नेहमिलन व राजकिय क्षेत्रातील नवनिर्वाचित समाज बांधवांचा सत्कार सोहळा“ रविवार तारीख 04/11/2018 रोजी ”अंजनादेवी सभागृह“ गोंधनी रोड, झिंगाबाई टाकळी नागपूर 30 येथे घेण्यात आला. त्यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.मुख्य अभियंता महावितरण नागपूर स्व.श्री दिलीपजी घुगल, प्रमुख पाहूणे डॉ.श्री किशोरजी घोरमारे, पो.नि.श्री प्रभाकरजी मत्ते, पो.उपनि.श्री अनिलजी देरकर, भा.ज.पा. आय.टी. सेल प्रमुख श्री केतनजी मोहितकर, श्री आशिषजी अतकरी उपस्थित होते. त्यावेळी मंडळाच्या वतीने समाजातील नवनिर्वाचित नगरसेवक/सरपंच/सदस्य एकुण 65 समाज बांधवांचा सत्कार करण्यात आला.
”मानसात देव शोधला“ चंद्रपूर येथील भुमित्र बहुउद्देशिय संस्था चे श्री किशनजी नागरकर यांनी कळविले होते की, चंद्रपूर येथील समाजबांधव श्री दिलीप आगलावे यांचा मुलगा चि. मन्नत यास वयाच्या आठव्या वर्षात या दुर्धर आजाराने ग्रासलेले आहे. श्री दिलीप आगलावे हे मोलमजुरी व पेंटींगची कामे करून कुटूंबाचा उदरनिर्वाह कसाबसा करतात. त्यातच मुलाला दुर्धर आजार व उपचारास लागत असलेला लाखोचा खर्च हे समजल्यावर तर ते हतबल झालेले आहेत. आम्ही चंद्रपूरचे समाज बांधवांनी आपसात मदत गोळा करून त्यांना दिलेली आहे आणि वैद्यकीय मदत सुध्दा देत आहोत. आपण सुध्दा नागपूर वरून होईल ते सहकार्य केले तर बरे होईल. या माहीती वरून आम्ही नागपूर मधून धनोजे कुणबी समाज सेवा संघाच्या वतीने वर्गणी करून दिनांक 2 डिसेंबर 2019 रोजी चंद्रपूरला श्री दिलीप आगलावे यांचे घरी भेट देवून मुलगा मन्नत चे आजाराबाबत विचारपूस केली व आर्थिक मदत दिली. त्यावेळी नागपूर वरून मंडळाचे संयोजक श्री पुंडलिक बोंडे, कोषाध्यक्ष श्री घनशामजी हिंगाने तसेच चंद्रपूरचे श्री किशनजी नागरकर, श्री साईनाथजी उपरे हजर होते.